नाशिक : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली जात आहे. संपूर्ण राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केली जात असतांना नाशिकमध्ये अभिनव प्रकारे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वक्तव्याचा निषेध करत राज्यपाल हटवा मोहीम राबवली आहे. नाशिकच्या नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतिने खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र पाठविले जाणार आहे. शहरातील विविध भागातून राज्यपाल हटवा या आशयाखाली पत्र तयार लिहून लाखों पत्र पाठविले जाणार आहे. काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले आहे. गांधीगिरी पद्धतीने शिवजन्मोत्सव समितीच्या वतिने हे आंदोलन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या नाशिकरोड समितीने आगळेवेगळे आंदोलन केले होते, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेचा फलक घंटागाडीत टाकून निषेध नोंदविला होता.
आता पुन्हा गांधीगिरी पद्धतीने राज्यपाल हटवा मोहीम राबवत लाखों पत्र लिहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र पाठवून राज्यपाल हटविण्याची मागणी करणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त आणि अवमान करणारे वक्तव्य करत असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने केली जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतिने राज्यपाल हटाव मोहीम राबविली असून शहरातील विविध नागरिकांकडून पत्र लिहून घेतले जाणार आहे, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले असून राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिक आक्रमक झाल्यानं येत्या काळात राज्यपाल पदमुक्त होतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.