पुणे : लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 14 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहावं लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. (Lohgaon Airport in Pune will be closed from October 15 to October 30)
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.
This is to inform all passengers that as per information received from Indian Air Force (IAF), due to runway resurfacing works, all flights from #PuneAirport will not operate for 14 days from 16 October 2021 to 29 October 2021.@AAI_Official @aairedwr @Pib_MoCA @DGCAIndia
— Pune Airport (@aaipunairport) October 5, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात 2 ऑक्टोबरला पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी त्यावेळी दिली. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं.
पुणे विमानतळासमोरील 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्याबाबतही शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. नितीन गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती बापट यांनी दिली होती.
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला होता.
इतर बातम्या :
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले, रोज किती भाविकांना दर्शन मिळणार?
काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज – नाना पटोले
Lohgaon Airport in Pune will be closed from October 15 to October 30