पुणे : व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आक्रमक मागणीनंतर अखेर राज्य सरकारनं पुण्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत पुण्यातील व्यापारी, दुकानं आदींना वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही शिथिलता देत असताना मात्र अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना इशाराही दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास शिथिलता मागे घेत पुण्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जातील असा इशारा अजितदादांनी दिला आहे. (Deputy CM Ajit Pawar’s warning to the people of Pune)
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट साडे तीन टक्क्याच्या आसपास आला आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांची मागणी लक्षात घेता शिथिलता देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली. त्यानंतर आज शिथिलता देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जातील असा इशारा अजितदादांनी दिलाय. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या 13 तालुक्यांसाठी लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत. सोमवारपासून हे नियम लागू असतील. काही लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातही शिथिलता देण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे 13 तालुक्यात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत.\
In Pune and Pimpri Chinchwad, all the shops to remain open till 8pm for six days a week. All hotels, restaurants allowed to operate with 50% seating capacity till 10pm on all days. All relaxations to be effective from 9th August: Maharashtra Minister Ajit Pawar
(file photo) pic.twitter.com/7nxIIIRL51
— ANI (@ANI) August 8, 2021
पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार आता पुण्यात
>> सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
>> हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
>> शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
>> मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
संबंधित बातम्या :
Deputy CM Ajit Pawar’s warning to the people of Pune