पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोची ट्रायल नुकतीच पार पडली. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे मेट्रोच्या कामाची मागील आठवड्यात पाहणी केली. त्यानंतर आता पुणे मेट्रोच्या उभारणीताल अजून एक अडथळा दूर होण्याची चिन्ह आहेत. कारण, राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश या महिन्याअखेरिस संपुष्टात येणार आहेत. कोरोना काळात कारवाईला दिलेली स्थगिती 31 ऑगस्टला संपणार असं उच्च न्यायालयानं जाहीर केलं आहे. पुणे मेट्रो संदर्भातील सुमोटो याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या उभारणीत अडथळा ठरणाऱ्या वस्त्यांवर कारवाईस प्राधिकरणाला हायकोर्टाकडून मुभा देण्यात आली आहे. (High Court allows action against huts obstructing Pune Metro work)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टॉमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. 2016 ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केलाय. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जात आहे. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
तत्त्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 30 जुलै रोजी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला होता. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 August 2021https://t.co/HX5B7bpAoh | #4Minutes24Headlines | #Maharashtra | #UddhavThackeray | #DevendraFadnavis | #PankajaMunde |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या :
पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच…
High Court allows action against huts obstructing Pune Metro work