पुणे : राजज्यभर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची (MNS) धरपकड सुरू आहे. काही मनसे कार्यकर्ते तर थेट नॉट रिचेबल गेले आहेत. मात्र काही मनसे कार्यकर्ते हे आरती करण्यावर आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यावर ठाम आहे. त्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत. मात्र राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आदेश हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे, असा इशारा इशारा आता मनसैनिकांनी दिला आहे. तर आता राज ठाकरेंनी पत्र लिहित परखड आणि आक्रमक पवित्राही स्पष्ट केला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील कसबा पेठ परिसरातील पुण्येश्वर मंदिर परिसरात पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे, याच मंदिराला लागून छोटा शेख सल्ला मज्जीद आहे, त्यामुळे या मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय मनसे कार्यकर्त्यांनी घेतलाय. त्र पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाहीये. मात्र या मंदिर परिसरात पुणे पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
नामदेवाच्या गाथेमध्ये उल्लेखलेलं आणि पुणे शहरचं नाव ज्यावरून पडलं अस पुण्येश्वर महादेवाचं मंदिर आहे. इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना धाकटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरात पुरातन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. या जागेत पूर्वी यादवांच्या काळातले पुण्येश्वर मंदिर होते हे सर्वज्ञात आहे. अशी या मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे या मंदिराला आणि या परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. मात्र याच मदिरात आरतीचा इशारा मनसेने दिल्याने तणाव वाढला आहे. त्यामुळे पोलीस कडेकोट पाहरा देत आहेत.
तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राज ठाकरे यांना अटक होऊ शकते अशा चर्चा सुरू आहे. अशात पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबार आणि त्यांनी इशारा देत केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
तर राज्यात जे काही होईल त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असे सूचक विधान गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. त्यामुळे सध्या जोरदार राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरच्या सभेत सतेज पाटील बोलत होते. तर कोल्हापूरच्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही यावरून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली याहे. महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते राज ठाकरेंचं समर्थन करत आहेत.