योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 11 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप युतीवर भाष्य केलं आहे. 2019 ला नेमकं काय घडलं? यावर संजय राऊत यांनी स्पष्ट विधान केलं आहे. 2019 मध्ये भाजप ने दिलेला शब्द पाळला नाही. भाजपसोबत सरकार बनवण्याचा तयार नाही. उदय सामंत यांना राजकिय प्रगल्भता नाही. उद्या सरकार पडलं तर उदय सामंत आमच्या दारात असतील पण आम्ही त्यांना घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना त्या सरकार मध्ये मुख्यमंत्री केले असते तर तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असती, असं संजय राऊत म्हणाले.
ललित पाटील प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. पोलिसांना हे प्रकरण माहिती आहे. हे फार मोठे रॅकेट आहे. नाशिक पोलिसांकडे मोठी यादी आहे. भाजप आणि इतर राजकारण्यांना हफ्ते जात होते. नाशिक मधल्या एका मंत्र्याला 50 लाख रुपये मिळत होते. महाविकास आघाडी बनत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचा विरोध होता, असं संजय राऊत म्हणालेत.
नवाब मलिक आणि भाजपची भूमिका यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. विधिमंडळ अधिवेशन आहे. आमदार सुनावणी सध्या सुरू आहे. आम्ही या सरकारचं अस्तित्व मानत नाहीत. नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? प्रफुल पटेल यांच्या बाबत ते उत्तर देत नाहीत. इकबाल मिर्ची हा संत माणूस होता? दाऊद विश्र्वपुरूष होता हे भाजप ने सांगावं, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
कांदा प्रश्नी निर्णय व्हायला पाहिजे. शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांना या प्रश्नाची जाण आहे. ते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांना या प्रश्नाची माहिती आहे. हा मराठा विरुद्ध ओबीसी प्रश्न नसून हा सर्वसमावेशक प्रश्न आहे, या तात्काळ निर्णय व्हावा, असं संजय राऊत म्हणाले.