Pune Ganeshotsav : दगडूशेठ गणपती बाप्पाला आईस्क्रीमचा मोतीचूर लाडू! अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड

| Updated on: Sep 08, 2022 | 3:23 PM

किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांच्या किगा आईस्क्रीमतर्फे हा अनोखा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. यासाठी जवळपास आम्हाला पाच ते सहा दिवस लागले.

Pune Ganeshotsav : दगडूशेठ गणपती बाप्पाला आईस्क्रीमचा मोतीचूर लाडू! अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड
दगडूशेठ गणपती बाप्पाला अर्पण केलेला आईस्क्रीमचा मोतीचूर लाडू
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या एका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati) बाप्पाला मोतीचूर बुंदीचा 130 किलोचा आईस्क्रीम नैवेद्य अर्पण केला आहे. शहरातील प्रसिद्ध किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या व्यापाऱ्यांनी मंडळाच्या 130व्या वर्षानिमित्त 130 किलो वजनाचा मोतीचूर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा (Ice-cream) नैवेद्य गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केला. 5 ते 6 दिवसाच्या परिश्रमाने हा आईस्क्रीमचा लाडू बनविण्यात आला. गणपतीला अर्पण केल्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. हा अनोखा प्रसाद घेण्यासाठी गणेशभक्तांचीही झुंबड उडाली होती. प्रसाद (Prasad) आईस्क्रीमचा असल्यामुळे तो लवकर संपवणेही आवश्यक असल्याने भाविकांना तो वाटण्यात आला. दरम्यान, आज सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे देखावे पाहण्याचा अखेरचा दिवस असणार आहे. उद्या विसर्जन असल्याने गणेश मंडळे तयारीला लागणार आहेत.

‘पाच ते सहा दिवस लागले’

किरण साळुंखे म्हणाले, की श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा 130 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कारणाने आम्ही खास 130 किलोचा आईस्क्रीम मोतीचूर लाडू बनवला आहे. यासाठी जवळपास आम्हाला पाच ते सहा दिवस लागले. दरवर्षी दगडूशेठ गणपतीसाठी आमचा काही ना काहीतरी संकल्प असतो. मात्र मागील दोन वर्ष कोरोनामुळे अनेक बंधने होती. यंदा मात्र आम्ही गणपती बाप्पासाठी खास हा मोतीचूर लाडू आणि आईस्क्रीम अर्पण केले आहे, असे किरण साळुंखे म्हणाले. किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांच्या किगा आईस्क्रीमतर्फे हा अनोखा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने आता पुढल्या वर्षी काय वेगळे असणार, याचीही उत्सुकता भाविकांना लागून राहिली आहे.

हे सुद्धा वाचा

दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सध्या मोठी गर्दी होत आहे. आज रात्री बारा वाजेपर्यंतच गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेता येणार आहे तसेच देखावे पाहता येणार आहेत. त्यानंतर विसर्जनाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळांची तयारी असणार आहे. त्यात पावसानेदेखील काल जोरदार हजेरी लावली होती. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीदेखील मुसळधार बरसरणार आहे. त्यामुळे काहीसा हिरमोड गणेशभक्तांचा होणार असल्याची शक्यता आहे