Traffic violations in Pune : बेशिस्त वाहनचालकांमुळे पुण्यात होतंय 20 टक्के वाहतुकीचं उल्लंघन, अपघातांमध्येही वाढ, वाहतूक पोलीस म्हणतात…

| Updated on: Aug 26, 2022 | 8:30 AM

नागरिकांना विनंती आहे, की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांनी कोणत्याही किंमतीत नियम मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Traffic violations in Pune : बेशिस्त वाहनचालकांमुळे पुण्यात होतंय 20 टक्के वाहतुकीचं उल्लंघन, अपघातांमध्येही वाढ, वाहतूक पोलीस म्हणतात...
वाहतुकीच्या नियमांचं वाहनचालकांकडून होत असलेलं उल्लंघन
Image Credit source: HT
Follow us on

पुणे : रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार अशा वाहनचालकांची संख्या वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. ‘एचटी’च्या वृत्तानुसार, हेल्मेट न वापरणारे आणि शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल तोडणारे दुचाकीस्वारही आहेत. वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांनी नोंदवलेल्या एकूण 9.96 लाख कारवायांपैकी (Actions) 20% दुचाकीस्वार नो-एंट्री झोनमध्ये आणि रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणारे आहेत. तळेगाव दाभाडे येथे रविवारी रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची कारला धडक बसून ते जखमी झाले, तर 17 ऑगस्ट रोजी एका वेगळ्या घटनेत कंटेनर वाहन चालवताना झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. पुणे-अहमदनगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला चुकीची कार एका कारला धडकली, अशा घटनांच्या नोंदी झालेल्या आहेत.

‘पोलिसांशी उद्धटपणे वर्तन’

पोलिस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे म्हणाले, की बहुतेक नो-एंट्रीचे उल्लंघन करणारे वाहतूक पोलिसांमार्फत पकडले जातात. त्यावेळी त्यांचे वर्तन पोलिसांशी उद्धटपणे असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची टक्केवारी बरीच वाढली आहे. याबाबत आम्ही कठोर कारवाई करत आहोत, असे ते म्हणाले.

विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची दिली होती धमकी

गेल्या गुरुवारी, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवल्याबद्दल दंड ठोठावलेल्या एका चिडलेल्या दुचाकीस्वाराने संबंधित वाहतूक हवालदाराला मारहाण केली. तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केल्यास विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी संबंधिताने दिली. पोलिसांनी सृष्टी यशवंत राऊत नावाची महिला आणि तिच्या सोबत असलेल्या शशिकला अशोक राऊत या दोघी शिवाजीनगर येथील रहिवासी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात घडली होती.

हे सुद्धा वाचा

‘पाच लाख जणांनी दंड भरला नाही’

पुणे वाहतूक शाखेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 7 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9.96 लाख वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला आहे आणि उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 40.31 कोटी रुपयांची वाहतूक थकबाकी वसूल करणे बाकी आहे. तब्बल 7.23 लाख वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी दंड भरला नाही. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत वाहतूक पोलिसांनी सात लाख व्यक्तींना दंड केला, त्यापैकी पाच लाख जणांनी दंड भरला नाही, तर एकूण 30 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की त्यांच्या नावे असलेला दंड न भरल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कारवाई केली जाईल.

‘वाहतुकीचे नियम पाळावेत’

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी एकूण 49,586 प्रकरणे अंतिम कारवाईसाठी न्यायालयात पाठवण्यात आली आहेत. उल्लंघन करणाऱ्यांना 15 दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. त्यांनी तसे न केल्यास, आम्ही त्यांच्या केसेस पुढील कारवाईसाठी न्यायालयात पाठवू. तसेच, नागरिकांना विनंती आहे, की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांनी कोणत्याही किंमतीत नियम मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे श्रीरामे म्हणाले.

ई-चलानकडे दुर्लक्ष

ई-चलान मिळाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे हे दंड वसूल न होण्याचे एक प्रमुख कारण आहे. अनेक नागरिक ई-चलन संदेशांकडे दुर्लक्ष करतात आणि दंड भरणे देखील टाळतात ज्यामुळे दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, अनेक वाहने मोबाइल क्रमांकाशी ऑनलाइन जोडलेली आहेत, जी सध्या वापरात असलेल्या मोबाइल क्रमांकांपेक्षा वेगळी असू शकतात. वाहतूक पोलिसांनाही काही लोक बनावट नंबरप्लेट लावून वाहने चालवत असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा ही वाहने नियमांचे उल्लंघन करतात, तेव्हा मूळ मालकांच्या मोबाइल क्रमांकावर ई-चलान पाठवले जाते आणि दंड मात्र पेंडिंगच राहतो.

मोबाइल क्रमांक अपडेट करत नाहीत

अनेक लोक त्यांची वाहने विकल्यानंतर आरटीओकडे नोंदणीकृत त्यांचे मोबाइल क्रमांक अपडेट करत नाहीत. परिणामी जुन्या वाहनधारकांना दंड आकारला जातो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहन जप्त केल्यानंतर दंडासाठी त्याची तपासणी केली जाते. तथापि, अशा प्रकरणांमध्ये, दंड भरण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट वाहनाला किती दंड आकारला जातो याचा मागोवा ठेवणे आवश्यक आहे. तसेच ई-चलान मिळाल्यावर लगेच भरणा केल्यास दंडाची रक्कम जमा होत नाही, असे पोलिसांनी सांगितले.