पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेवजवळ असलेल्या शेलारपट्टा परिसरातील एका शेततळ्यातील 5 टन मासे अचानक मृत्यूमुखी पडले आहेत. अशोक केवटे असं शेततळ्याच्या मालकाचं नाव आहे. इतक्या माशांचा अचानक मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. मृत झालेले मासे रूपचंद जातीचे होते. अज्ञात व्यक्तीने शेततळ्याच्या पाण्यात विषारी औषध टाकल्यानं मृत्यू झाल्याचा संशय आहे. पीडित शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अशोक केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात 8 महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे 30 हजार बीज सोडले होते. सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते. मात्र रात्री अचानक अज्ञात व्यक्तीने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे 5 टन माशांचा मृत्यू झाला. यात या शेतकऱ्याचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे.
30 thousand fish dead in farm lake of Indapur Pune due to Poison