पुणे – खडकवासला धरणसाखळीतील (Khadakwasla Dam) चार धरणांमध्ये आतापर्यंत 9.11 टीएमसी पाणीसाठा (TMC water storage) शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन पुण्यातील (Pune) लोकांना केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.11 टिएमसी म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 4 मेपर्यंत हा पाणीसापुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाणीसाठा 40 टक्क्यांपेक्षा जास्त होता असं जलसंपदा विभागाने सांगितलं आहे. पाणी काटकसरीने वापरल्यास पाणीटंचाईची समस्या उद्धभवणार नाही.
खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराला पाणी पुरवठा मुख्य धरण आहे. त्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने जलसंपदा विभागाकडून लोकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यंदाचा पाऊस वेळेत पडला नाहीतर, पाणी समस्या मोठी होईल या अनुशंगाने आवाहन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात अधिक तापमान असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली तर लोकांना अधिक त्रास होईल. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शहराला पाणी पुरेल, असा पाणीसाठा जलसंपदा विभागाकडून ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.