पुणे : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला चापर मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे. ही तक्रार पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.(Filed a case of assault against Mahesh Manjrekar)
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महार्गावर ही घटना घडली आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीनं धडक दिली. त्यानंतर मांजरेकर यांनी खाली उतरुन गाडीची पाहणी केली. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारल्याचा आरोप कैलास सातपुते यांनी केला आहे.
आपल्या पुढे गाडी चालवणाऱ्या मांजरेकर यांनी अचानक ब्रेक मारला. त्यामुळे आपली कार त्यांच्या कारला मागून धडकली. त्यानंतर मांजरेकर यांनी ‘तू गाडी पिऊन गाडी चालवतो का’ असं म्हणत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असं तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटलंय. या घटनेचा व्हिडीओ तक्रारदाराने सोशल मीडियावर शेअर केलाय.
अभिनेते महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार ऑगस्ट 2020 मध्ये समोर आला होता. मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज पाठवण्यात आला होता. अबू सालेम टोळीकरुन मांजरेकर यांनी धमकी आल्याची माहिती होती. या प्रकरणात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होतं. रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
#Correction Director & actor Mahesh Manjrekar received an extortion* call from a person, in the name of underworld don Abu Salem. Anti-extortion cell has arrested an accused, who was trying to extort Rs 35 crore through the threat call: Mumbai Police
— ANI (@ANI) August 27, 2020
संबंधित बातम्या :
Filed a case of assault against Mahesh Manjrekar