पुणे : पुण्याच्या खेड (Khed) तालुक्यातील आंबेठाण येथील शंभर फूट खोल विहिरीत (Well) दोन दिवसांपासून एक कुत्रा (Dog) पडला होता. या अडकलेल्या कुत्र्याला नेचर गार्ड ऑर्गनायझेशन व चाकण रेस्क्यू (Rescue) टीमच्या सदस्यांनी जीवनदान दिले आहे. आंबेठाण येथील 100 फूट खोल विहिरीत हा कुत्रा पडला होता. या विहिरीला पायऱ्याही नाहीत. त्या विहिरीत हा कुत्रा पडला होता, त्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर येणे शक्य नव्हते. त्याला विहिरीमधून जवळपास 3 तास बचावकार्य करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, सचिन भोपे, विक्रांत चौधरी, प्रशांत अष्टेकर, मयूर, श्रीकांत साळुंके व हितेश घुगरे यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी आतापर्यंत अनेक प्राण्यांना बचावकार्याच्या माध्यमातून जीवदान दिले आहे.
पायऱ्या नसल्यामुळे प्रथम विहिरीत मोठी दोरी टाकण्यात आली. त्याच्या सहाय्याने बचाव पथकातील एक सदस्य विहिरीत उतरला. त्यानंतर कुत्र्याला बाहेर कसे काढायचे याची चर्चा विहिरीतील आणि विहिरीच्या बाहेरील सदस्यांनी केली. मग दोरीच्या सहाय्याने कुत्र्याला व्यवस्थित आणि सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला इजा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. व्हिडिओ पाहा –
#Pune : आंबेठाण येथील शंभर फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकला होता कुत्रा… नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि चाकण रेस्क्यू टीमनं दिलं जीवनदान…
पाहा व्हिडिओ – #Rescue #dog #Video
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/LfzBaI0NZs— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2022