रणजित जाधव, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : वारकरी हे महाराष्ट्राच वैभव आहे. हे सरकार तुमचे आहे. आम्ही इंद्रायणी (Indrayani) स्वच्छ करू, असं आश्वासन मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी दिलं. इंद्रायणी स्वच्छ करा, यासाठी एक वारकरी एकनाथ शिंदे यांच्या भाषण सुरू असताना मागणी केली. त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी स्वागत केलं.
माणसात राग, द्वेष, मत्सर असतो, स्पर्धा असते. स्पर्धा असावी पण ती लोकांची कामे करण्यासाठी. आम्ही जो तीन महिन्यांपूर्वी कार्यक्रम केला तो जनतेसाठीचं असंही शिंदे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री म्हणाले, पांडुरंगाची पूजा करण्याचं भाग्य मिळालं तो दिवस अविस्मरणीय आहे. तिथल्या वारकऱ्यांना पाहून मला निर्णय घेतला तो योग्य आहे हे जाणवले, असंही शिंदे म्हणाले.
वारकरी संप्रदायात मोठी शक्ती आहे. ही शक्ती कुठेही पाहायला मिळत नाही, धावपळीच्या जीवनात आपण पांडुरंगाच्या चरणी लिन होतो.
महाराष्ट्राला वारकऱ्याचं आगळंवेगळं स्थान आहे, त्याचा अभिमान आहे. धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाच्या चरणी आपण जात असतो.
आपल्या संस्कृतीतं गुरुला आणि आईचं स्थान मोठं आहे. गुरुंना गुरुमाऊली म्हणतो. दासोपंत यांच्या कार्याचा गौरव केला. खऱ्या अर्थानं सर्वांच्या वतीनं सत्कार करतो.
राज्याला महान वारकरी परंपरा लाभलेली आहे. सगळे भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेमध्ये शक्ती आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
भक्त मृदंग वाजवित होते. हजारो लोकं या संस्थेतून शिक्षण घेतात. कर्नाटक, आंध्रप्रदेशातही भजन, कीर्तनाचं शिक्षण दिलं जातं.
या कार्यक्रमाचा योग आला आहे. या वैभवशाली असा आहे. वैभवात भर घालणारी कार्य यात होत आहेत.
आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह चुकवत नसतं. मलाही ते सोबत घेऊन जातं. याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.