पुणे : महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण 30 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. पुरंदरला आढळलेल्या झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार आहे.
केंद्राचं तीन जणांचं पथक बेलसर गावाची पाहणी करणार आहे. दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.
बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण आढळल्यानं जेजुरीकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जेजुरी व परिसरातील गावांमध्ये सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जेजुरी परिसरात डेंग्यु, चिकन गुनिया आजारानं घातलं थैमान घातलं आहे.
जेजुरीतील ग्रामीण रुग्णालय केवळ कोरोना उपचार आणि लसीकरणापुरतेच उरले आहेत की काय, अशी विचारणा आता नागरिक करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात इतर आजारांवर उपचार बंद असल्याने नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत.
राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी 30 जुलै रोजी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.
झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.
(A team from the Center will visit Belsar village of Purandar, which is infected with Zika virus)
हे ही वाचा :
महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला
कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?