चक्क लंडनहून कसब्यात मतदानासाठी, तरुणीने बजावला मतदानाचा हक्क; म्हणाली, तुम्हीही…

| Updated on: Feb 26, 2023 | 11:08 AM

कसब्यात अत्यंत धीम्यागतीने मतदान सुरू आहे. कसब्यात सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अवघे 6.5 टक्के मतदान झालं आहे. मतदार दुपारपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चक्क लंडनहून कसब्यात मतदानासाठी, तरुणीने बजावला मतदानाचा हक्क; म्हणाली, तुम्हीही...
kasba bypoll
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह कमी असतो असं नेहमी सांगितलं जातं. आज कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. गेल्या चार तासात कसब्यात फक्त साडे सहा टक्केच मतदान झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, असं असलं तरी एक तरुणी चक्क लंडनहून कसब्यात मतदानासाठी आली आहे. फक्त मतदानासाठी ही तरुणी कसब्यात आली आणि आपल्या मतदानाचा हक्कही बजावला आहे. तसेच पुणेकरांना तिने मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.

अमृता देवकर असं या तरुणीचं नाव आहे. ती 24 तासांचा प्रवास करून लंडनच्या मँचेस्टरमधून आली आहे. मला कळलं निवडणूक लागली आहे आणि मी लगेच माझा हक्क बजावण्यासाठी आले. मतदान हा आपला अधिकार आणि हक्क आहे. सगळ्यांनी तो बजावलाच पाहिजे. आपल्याला पुढे जायचं असेल, आपला देश पुढे न्यायचा असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. हाच संदेश देण्यासाठी मी इतक्या लांबून मतदानासाठी आले आहे, असं अमृता देवकर यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अन् निर्धार केला

मी ज्या दिवशी येणार आहे. त्याच दिवशी मतदान होणार आहे असं मला कळलं. मग म्हटलं माझा मतदानाचा हक्क का सोडावा. त्यामुळे मी मतदान करण्याचा निर्धार केला. त्यामुळे पहिलं मतदानाचं काम करायचं ठरवलं आणि नंतर बाकी कामं करायचं ठरवलं, असं अमृता म्हणाल्या.

रात्री मुंबईत, सकाळी पुण्यात

मी लंडनच्यावेळेनुसार काल सकाळी साडे आठ वाजता विमानात बसले. काल रात्री दीड वाजता मुंबईत आले. 3 वाजता मी मुंबई विमानतळाहून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी साडेसात आठ वाजता मी पुण्यात आले. त्यानंतर घरी गेले. फ्रेश झाले. अन् मतदानाचा हक्क बजावला, असं त्यांनी सांगितलं.

मतदानाला अल्प प्रतिसाद

कसब्यात अत्यंत धीम्यागतीने मतदान सुरू आहे. कसब्यात सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अवघे 6.5 टक्के मतदान झालं आहे. मतदार दुपारपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर, हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला ही सीट राखण्याची आशा वाटत आहे.