Pune Anand Dave : देवेंद्र फडणवीसांच्या 14 ट्विटनंतर हिंदू महासभेचे भाजपाला 17 सवाल; काय म्हणाले आनंद दवे?

| Updated on: Apr 15, 2022 | 3:52 PM

भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) 14 ट्विटनंतर हिंदू महासंघाने (Hindu Mahasabha) फडणवीसांना 15 प्रश्न विचारले आहेत. राज्यात मराठा आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे पाप हे भाजपा सरकारने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pune Anand Dave : देवेंद्र फडणवीसांच्या 14 ट्विटनंतर हिंदू महासभेचे भाजपाला 17 सवाल; काय म्हणाले आनंद दवे?
पत्रकार परिषदेत बोलताना हिंदू महासभेचे आनंद दवे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) 14 ट्विटनंतर हिंदू महासंघाने (Hindu Mahasabha) फडणवीसांना 15 प्रश्न विचारले आहेत. राज्यात मराठा आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे पाप हे भाजपा सरकारने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात हिंसेची भाषा वापरणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली, यासह 15 प्रश्नांची उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावी, असे आवाहन हिंदू महासभेकडून करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर हा वाद राज्यात सुरू झाला. राज ठाकरेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. तर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला होता. यावेळी जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आदी विषय पुन्हा काढण्यात आले. यावरच हिंदू महासभेने टीका केली आहे.

हिंदू महासभेने केलेले काही प्रश्न

– जगमोहन यांच्या काळात काश्मीरमध्ये सर्वाधिक हत्याकांड घडले त्यांना दोनवेळा भाजपाने खासदार कसे केले?
– प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली, त्याला भाजपाने का विरोध केला नाही?
– व्ही. पी. सिंग सरकारने मंडल आयोग आणला त्यावेळी का विरोध नाही केला?
– मराठा-ओबीसीत फूट का पाडली?
यासह विविध प्रश्न हिंदू महासभेने विचारले आहेत. जवळपास 17 प्रश्नांची प्रश्नपत्रिकाच फडणवीसांना त्यांनी पाठवली आहे. या प्रश्नांची उत्तरे भाजपाकडून अपेक्षित असल्याचे आनंद दवे यांनी म्हटले आहे.

पाहा, आनंद दवे यांची पत्रकार परिषद

काय ट्विट केले होते देवेंद्र फडणवीसांनी?

देवेंद्र फडणवीस यांनी विविध चौदा ट्विट करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. काश्मीर फाइल्स, नवाब मलिक अटक, 012मधील आझाद मैदान हिंसाचार आणि रझा अकादमी, हिंदू दहशतवादी शब्दप्रयोग, सच्चर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी, मुस्लीम आरक्षण पुढाकार अशा विविध विषयांवर फडणवीसांनी ट्विट केले होते.

आणखी वाचा :

Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्यावर पीडित तरुणी ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा, कुचिक यांनाही दिला रविवारपर्यंतचा अल्टिमेटम

Pune MNS clashes : पुण्यात मनसेतील मतभेद चव्हाट्यावर! ‘हनुमान चालिसा’चा कार्यक्रम अजय शिंदेंचा, वसंत मोरेंचा आरोप

Pune : पत्नीच्या अपहरणाचा कट फसला; पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी केली अटक