पुणे : शरद पवार यांनी आपली राजकीय निवृत्तीची घोषणा करताच राज्यातीला राजकीय खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षासह विरोधकांना हा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी शरद पवार यांचा हा निर्णय धक्कादायक आणि वेदानादायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ज्यांनी शरद पवार यांच्याविरोधात कधी काळी आंदोलन केले होते,
त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या राजकारणाची आणि त्यांच्या अनुभवाची देशाला गरज असल्याचेही सांगितले.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहावं. कारण त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता माजी मंत्री रासपचे अध्यक्ष
पवार साहेबांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी आजचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या पक्षासह आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे नुकसान झाल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा असंही त्यांनी म्हटले आहे.
तर त्याच वेळी महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी बोलताना सांगितले की, अजित पवार यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आज शरद पवार यांच्या या निर्णयामुळे राजकीय समीकरणं बदलली असली तरी अजित पवार हे शरद पवारांच्या पुढे जाणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शरद पवार यांनी डोळे उघडल्यावर तर अजित पवार शांत बसतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
आजच्या दिवशी हा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला असला तरी ते असा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. आज महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना 5 लाख 55 हजाराचा निधी दिला आहे.
त्याचबरोबर 500 च्या नोटांची माळ गळ्यात घालून महादेव जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी राहुल कुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
त्यांच्या राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले की, सध्या आम्ही आमची ताकद तयार करतो आहे. तर आमची जेवढी औकात आहे तेवढी करू मात्र राहुल कुल आमच्यामुळे आमदार झाले आणि आम्हाला सोडूनही गेले मात्र ते पुन्हा आमदार होणार नाहीत असा त्यांना त्यांनी खोचक टोलाही लगावला आहे.