पुणे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले होते. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकारणही ढवळून निघाले होते. त्यामुळे पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत राजकीय नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेत.
या संदर्भात वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता शरद पवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#MPSC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 23, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, ‘तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे.
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असे ट्विट करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्यांचे आभार मानले आहेत.
शरद पवार यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आयोगाबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचाही त्यांनी शब्द दिला होता.
तर शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेट घेतली होती,याबाबत विद्यार्थ्यांना अश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर आज विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट एमपीएसीन केले.
एमपीएसीने जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनीही हे आंदोलन मागे घेत एकनाथ शिंदे, शरद पवार यांचे आभार मानले आहे.