पुणे | 20 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वाद आता पवार कुटुंबियांमध्ये येवून पोहोचतो की काय? अशी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर बारामतीत आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना घेराव घातला. संबंधित प्रकार हा कॅमेऱ्यातही कैद झालाय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना अजित पवारांची बदनामी का करत आहात? असा जाब विचारला. यावेळी युगेंद्र पवार यांच्यासोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर युगेंद्र पवार तिथून निघून गेले. पण या प्रकाराची सध्या बारामतीत जोरदार चर्चा सुरु आहे.
युगेंद्र पवार यांना बारामतीत घेराव घालण्यात आला. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र पवार यांना घेराव घातला. योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांची बदनामी केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. युगेंद्र पवार घराघरात जावून भेटीगाठी घेत आहेत. अशावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं. योगेंद्र पवार अजित पवार यांचा अपप्रचार करत आहेत, असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे.
शरद पवार यांच्यासोबत असणारे कुटुंबिय हे शरद पवारांच्या बाजूने प्रचार करत आहेत. युगेंद्र पवार यांचा आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा आयोजित केलेला होता. यावेळी एका गावात अजित पवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला. या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना जाब विचारला. सोशल मीडियावर अजित पवारांची बदनामी का करत आहात? असा जाब कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना विचारला.
दोन दिवसांपूर्वी बारामतीत श्रीनिवास पवार यांनी भाषण केलं होतं. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अजित पवार गटावर टीका केली जात होती. अखेर आज युगेंद्र पवार बारामतीत दौऱ्यावर असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत सोशल मीडियावर अजित पवारांची बदनामी का करताय? असा सवाल केला. यावेळी युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांशी बातचित केली. त्यानंतर युगेंद्र पवार तिथून पुढे निघून गेले.