राज्याच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती विधानसभा मतदारसंघाची… या मतदारसंघात पहिल्यांच अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळतेय. या मतदारसंघात काय होणार? याकडे राज्याचं लक्ष आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. आपण बारामतीतून लढणारच नव्हतो, असं अजित पवार म्हणालेत. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला अजित पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. बारामतीत यंदा उभं राहणारच नव्हतो. मी शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलो होतोय तशी चाचपणी करायला लावली होती, असा खुलासाच खुद्द अजित पवार यांनी केलाय.
बारामतीतून उभं रहाणार नव्हतो. शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलेलो. शिरुर, पुरंदर, सिन्नर विधानसभा मतदार संघातून संधी होती. असा खुलासाही अजित पवारांनी शिरुरमधील सभेतून केला. आता तुम्ही माझी करु नकाय बारामतीकर पाहून घेतील असं म्हणत बारामतीची परिस्थिती सुधारलीय, असंही अजित पवार म्हणाले.
वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. महायुती सर्व जण आता प्रचार करत आहे. तगडे उमेदवार देण्याचा पर्यंत केला आहे. पुढच्या वेळी मतदारसंघाची फेर रचना होणार आहे. महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी केलं आहे. मागच्या निवडणुकीत झालेले त्रुटी आम्ही सुधारतोय. कारण त्यावेळेस एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. त्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. आपल्याला पुन्हा महायुतीचा सरकार राज्यामध्ये आणायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.
बजेटमध्ये आम्ही ठरवलं होतं की, आपल्याकडून कोणतेही घटक राहिले नाही पाहिजे. त्यामध्ये माय माऊलींकडे म्हणजे आतापर्यंत कोणत्याही सरकारने लक्ष दिलं नाही. त्यांच्यासाठी आमच्या सरकारने योजना आणल्या. अनेक योजनांसाठी 75 कोटी लागले आणि विरोधक कोर्टात गेले. तर आता बोलतात आमचे सरकार आले तर या योजना बंद करू आता यांच्या पोटात का दुखतं? पुढे या योजना चालू ठेवायचा असेल तर महायुतीचे सरकार आले पाहिजे. यांनी सांगितले तिजोरीत पैसेच राहिले नाही. घ्या काढून असं सांगितलं गेलं. आता भावाने एकदा ओवाळणी टाकल्यानंतर पुन्हा भाऊ मागे घेतो का? यांच्या काकांनी असे केलं होत का?, असं म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय.