बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. अशातच पवार कुटुंबातील लोकही निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. नणंद विरूद्ध भावजय या लढतीत अख्खं पवार कुटुंब उतरल्याचं अजित पवार म्हणालेत. पण निवडणुकी झाल्यावर हे लोक नसतील, असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.
कोण अॅग्रो-फिग्रो दम देत असेल तर त्यांना घाबरू नका. आपला दम लई भारी आहे. मी ऊस घेऊन जाईन तुमचा… अफवांवर विश्वास ठेवू नका. कार्यकर्त्यांना दम देऊ नका. उद्या निवडणूक झाली की इथं मीच आहे. हे सगळं कुणी येणार नाही. सगळे परदेशात जातील. इथं सगळी गर्मी आहे म्हणतील आणि परदेशात जातील. आता सगळे उगवले आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगवल्यासारखं सगळे घरचे आले आहेत. एका एकेकाला… चार दिवस सासूचे अन् चार दिवस सुनेचे असतात. आमच्या घरात तर सुनेलाच परक मानलं जातं. सासऱ्याचे दिवस राहत नाहीत. कधीतरी सुनेचे दिवस येतील, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांसह पवार कुटुंबियांवर टीका केली आहे.
कुणीच काही करू शकत नाही. मी एक तर कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर मी कुणाला सोडत नाही. कुणीच माझ्या नादी लागू नका. मी खपवून घेणार नाही. माझ्या लोकांना दमदाटी करू नका मस्ती दाखवू नका मस्ती मला जिरवता येते. मी कुणाला म्हणत आहे समझनेवाले को इशारा काफी है, असंही अजित पवार म्हणाले.
शरद पवारसाहेबांनी 71 हजार कोटी रुपयांचं देशाचं कर्ज माफ केलं. देवेंद्र फडणवीस राज्यात झाले आणि त्यांनी एकट्या राज्यात 35 हजार कोटींचे कर्ज माफी दिली. आम्ही आता हर्षवर्धन पाटील आणि मी एकमेकांच्या विरोधात लढून थकलो. पण विकास त्याचा प्रश्न यातून सुटू शकत नाही. आपल्याला तर विकास करावा लागेल म्हणून एकत्र आलो आहे. आम्ही आता सगळ्याना सहकार्य करू. सागळ्यांनी एकत्र येत काम करा. मला बारामतीमधून 1 लाख 68 हजारांच लीड मिळालं. विरोधकांच डिपॉजित जप्त होतं. म्हणून मला तिेथ काम करावं लागतं, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.