नाना पटोले यांना घोटाळ्याची कल्पना दिली होती, अजित पवार म्हणाले, असा दिला होता इशारा

| Updated on: Jan 14, 2023 | 8:59 PM

जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे सर्व जण बसू. पुढची काय भूमिका घ्यायची. शिवसेनेचं काय मत आहे. काँग्रेसचं काय म्हणणं आहे. नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं ऐकावं लागेल.

नाना पटोले यांना घोटाळ्याची कल्पना दिली होती, अजित पवार म्हणाले, असा दिला होता इशारा
अजित पवार
Follow us on

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काँग्रेसनं सुधीर तांबे यांना एबी फार्म दिला होता. पण, त्यांनी तो फार्म भरला नाही. त्याचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष फार्म भरला. यामुळं काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार उभा राहू शकला नाही. या प्रकरणी अजित पवार यांनी नाना पटोले यांच्याशी फोनवर बोलणं केलं होतं. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी स्वतः बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो होतो. कुठे बैठका झाल्या. कशा बैठका झाल्या. हे सर्व त्यांना सांगितलं होतं. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांनी कितपत विश्वास ठेवायचा हा त्यांचा विषय होता. पण, मोठ्या प्रमाणावर गडबड होणार आहे, अशा इशारा दिला होता, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

डमी अर्ज भरून ठेवावा

बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी या प्रकाराची नोंद घ्यावी. एखादा डमी अर्ज भरून ठेवा, असं सुचविलं होतं. सत्यजित तांबे यांच्या बाबतीत जी गोष्ट कानावर आली होती ती सांगितली होती.

महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलून निर्णय

उद्या मुंबईला जातोय. तिथं गेल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलणार आहे. शुभांगी पाटील या उद्धव ठाकरे यांना भेटल्या. काही सहकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. त्यांनी पाठिंबा मागितला आहे. काँग्रेसचं आता काय मत आहे. कारण सिटिंग आमदार असल्यानं ती जागा त्यांना दिली होती.

एकटा निर्णय घेऊ शकत नाही

राष्ट्रवादीची भूमिका एकटा घेऊ शकत नाही. जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे सर्व जण बसू. पुढची काय भूमिका घ्यायची. शिवसेनेचं काय मत आहे. काँग्रेसचं काय म्हणणं आहे. नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं ऐकावं लागेल.

त्यावेळी फोनवर बोलणं झालं होतं

ही जबाबदारी ही बाळासाहेब थोरात यांची होती. त्यांच्या घरातली सिटी होती. औरंगाबादचा विक्रम काळे यांचा फार्म भरायला गेलो असताना बाळासाहेब थोरात आणि माझं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांच्याशी बोललो होतो, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

उद्या मुंबईत बैठकीमध्ये नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही. पुढील रणनीती कशी ठरवायची, हे महाविकास आघाडीचे नेते बसून ठरवू, असंही अजित पवार यांनी म्हंटलं.