पुणे : राज्य सरकारने मागच्या कॅबिनेटच्या बैठकीत (Eknath Shinde Cabinet Meeting) निर्णयांचा धडाका लावला. अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, मात्र त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) या निर्णयांवरती सडकून टीका केली. पुन्हा नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली. तर त्याआधीच सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला होता. मात्र आजच सहकार्य संस्थांच्या निवडणुकांनाही स्थगिती (Election 2022) मिळाली आहे. सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर अजित पवार चांगलेच भडकडून उठले आहेत, ही लोकशाहीची थट्टा लावलेले आहे, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली आहे. आपण घटनेला मानून पुढे जातो आपण लोकशाही मानणारे लोक आहोत. देशात कायद्याचं राज्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली आहे. मात्र या ठिकाणी लोकशाहीची थट्टा लावली आहे, लोकशाहीचा खून पाडला जातोय, असा थेट आरोप पुण्यातून अजित पवारांनी केलाय.
तसेच त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि भाजप यांना पुन्हा डिवचलं आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलं नाही, सत्ता येथे जाते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? हे त्यांचं त्यांना माहीत, पुणे जिल्हा चारपट पाणी येतंय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी बंधारे फुटले, तलाव फुटले आहेत. त्याचे पंचनामे करून मदत झाली पाहिजे. शेतकरी अडचणीत आले आहेत. सहकारच्या निवडणुका चालू होत्या. त्या पुढे ढकलल्या. मी आज सहकारी कारखान्याची सभा घेऊन आलो. 17 तारखेला मतदान आहे. मात्र पट्ट्यांनी हे काढलं. हे काय चाललंय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय.
आज आपलं सरकार नसलं तरी आपण विरोधी पक्षात आहे आणि आपली ताकद कमी आहे. शिंदे आणि फडणवीस अजून मंत्रिमंडळ स्थापन करत नाहीत, अरे बाकीच्यांना घ्या ना, 42-43 जणांचं मंत्रिमंडळ करता येतं, मी स्पष्ट बोलतो पण दुजाभाव केव्हा केला नाही. या सरकारचा निर्णय बघा, सदस्य एका विचाराचा आणि सरपंच वेगळ्या विचाराचा, दोघं कसं काम करणार? अडचणी येतात. राष्ट्रपतीची निवडणूक आहे आता आमदारांनी खासदार मतदान करतात, देशातील जनता या निवडणुकीला मतदान करते का? असा सवाल ही अजित पवारांनी उपस्थित केलाय. जे आरक्षण काढायचं ते काढा याबद्दल दुमत नाही, मात्र डायरेक्ट सरपंच निवडून द्यायचा, त्यामुळे नागरिकांवर अन्याय होतोय, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.