सातारा: मराठावाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठवाड्यात अजून गेले नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्युत्तर दिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
अजित पवार आज साताऱ्यात आहेत. आज सकाळी 7.30 वा त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मराठवाडा भागात अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पहानी करायला गेले नाहीत असं विरोधक म्हणत आहे. पण पाहणी केली म्हणजेच सर्व कळते असे नाही. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत. आजही ते गेले आहेत. मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांना काय मदत पाहिजेत याचा आढावा घेतला जात आहे. जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. आम्ही गेल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यांचं अख्या दिवसाचं काम बुडते. त्यामुळे गैरसमज पसरवू नका, जेथे पाहणी केली पाहिजे तिथे केली पाहणी जात आहे, असं पवार म्हणाले.
एफआरपीबाबत राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वर्षाची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. तसेच राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातील सर्व नुकसानाची माहिती घेतली आहे. सर्व पैसे आले आहेत. पिकांचे पैसे आद्याप आलेले नाहीत. उद्या मुंबईत सर्वांची बैठक घेऊन पैसे कसे देता येतील याचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. परंतु अद्याप 18 वर्षाच्या आतील मुलांचे लसीकरण झाले नाही. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, 12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण कराव अशी चर्चा आहे. मात्र अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नसून केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, असंही ते म्हणाले.
नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पारनेर आणि संगमनेर तालुक्यात अशाप्रकारे परिस्थिती बनायला लागली आहे. पुणे आणि नाशिक जिल्हा या दोन तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे. अन्यथा याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
पाटण येथील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पण त्या ठिकाणी माती प्रचंड झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन करू नका, असं गावकरीही म्हणत आहे. पाच लाख कबुल केले होते, ते दिले आहेत. केंद्र सरकारने मदत जाहिर केली होती मात्र आद्याप आलेली नाही. पाटण तालूक्यात आज पाहणी करायला केंद्रातील लोक आले आहेत. पुनर्वसनाचा आराखडा चांगला केला आहे. जागा खरेदी करावी लागणार आहे, निधी आलेला नाही. तो निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 APM | 4 October 2021 https://t.co/BukMbAOLa6 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2021
संबंधित बातम्या:
नगरच्या 61 गावात लॉकडाऊन, पुणे, नाशिकचं काय होणार? अजित पवारांनी धोका सांगितला
Bhavana Gawali: आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आता भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?
Nagpur ZP : नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात, महाविकास आघाडीची रणनीती काय?
(Ajit Pawar slams opposition leader over floods in maharashtra)