पुणेः पुण्यात आज एका नाविन्यपूर्ण आमि दुर्मिळ पांढरा नाग (White snake) आढळून आल्याने अनेक आश्चर्याचा धक्का बसला आहे. या नागाला पाहण्यासाठी अनेक जणांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील घोरेपडाळमध्ये (Pune Ghorpadal) राहणारे शेतकरी सचिन सोंडकर यांच्या घरात हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. घरात आढळून आलेला पांढरा नाग हा साडेचार फुटाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. पुण्यातील घोरेपडाळमध्ये पांढरा नाग असल्याचे समजताच सर्पमित्र पंकज गाडेकर यांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आले.
त्यानंतर नागाला पकडून वनविभागाच्या मदतीने वन विभागात सोडून देण्यात आले. अनुवांशिक विकारामुळे या सापाचा रंग पांढरा असल्याचे तज्ज्ञांनचे म्हणणे आहे.
या पांढऱ्या नागाची प्रजात नामशेष होण्याच्याच मार्गावर असल्याचेही सांगण्यात आले.
पुण्यातील ज्या ठिकाणी पांढरा साप आढळून आला आहे. त्या सापाला अल्बिनो कोब्रा असंही संबोधले जाते. पांढरा रंग आणि लाल डोळे असलेला हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या तुलनेत अतिशय विषारी असल्याचेही प्राणीतज्ज्ञांनी सांगितले.
इतर सापांच्या तुलनेत तो खूप वेगाने सरपटत जातो. अल्बिनो सापाची गणना जगातील 10 दुर्मिळ प्राण्यांमध्ये केली जाते असंही आता सांगण्यात येत आहे.
संपूर्ण देशात आतापर्यंत केवळ 8 ते 10 पांढरे कोब्रा दिसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोब्रा सामान्यतः काळा रंगाचे असतात. मात्र, ल्युक्जिममुळे सापांच्या शरीरात रंगद्रव्य नसल्याने त्यांचे संपूर्ण शरीर पांढरे होते असंही सांगण्यात आले आहे.
जगात सध्या असलेल्या किंग कोब्राच्या चार प्रजातींना अद्याप अधिकृत नावे देण्यात आलेली नाहीत. मात्र नैऋत्य भारतातील पश्चिम घाट वंश, पश्चिम चीन आणि इंडोनेशियाचा इंडो-चायनीज वंश, भारत आणि मलेशियाचा इंडो-मल्यायन वंश आणि फिलीपिन्समध्ये आढळणारा लुझोन बेट वंश.