पुणे: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. साताऱ्यातील (satara) विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती. या भेटीत अजित पवार यांनी उदयनराजे यांनी मांडलेले साताऱ्यातील अनेक प्रश्नांचा फोनाफोनी करून तिथल्या तिथे निकालही लावला. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या भेटीनंतर उदयनराजे भोसले काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजे मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडलं. त्यामुळे उदयनराजे खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत नगरपालिकेच्या हद्दवाढी नंतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा झाली. सातारा नगरपरिषद ही ‘अ’ वर्ग दर्जाची नगरपरिषद आहे. नुकतेच हद्दवाढ झालेल्या भागाचे सर्वेक्षण करण्यात आलेय यात या भागात रस्ते, लाईट, पथदिवे आणि ओपन स्पेस विकसित करण्यासाठी सुमारे 4,850 लाख एवढ्या निधीची गरज भासणार आहे. हा निधी नगरपालिकेला मिळावा म्हणून खासदार उदयनराजें भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विनंती केली.
तसेच नगरपालिकेच्या इतर विषयांवर सुद्धा या भेटीत चर्चा करण्यात आली. मात्र उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भेटीबद्दल साताऱ्यात चांगलीच राजकीय चर्चा सुरु झाली असून आमदार शिवेंद्रराजेंना चेकमेट देण्यासाठी उदयनराजेंनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे पवार-राजे यांच्या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे.
तब्बल तासाभराच्या भेटीनंतर उदयनराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. साताऱ्यातील विकास कामांसंदर्भात ही भेट घेण्यात आली. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर शिवाजी महाराजांनी जशी भूमिका मांडली होती सर्व धर्म समभावाची
तशीच माझी भूमिका आहे. सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी चर्चेचं रान मोकळं करून दिलं आहे.
Udayanraje Bhonsle Ajit Pawar Meet : उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यात बैठक, कोणत्या मुद्यावर चर्चा?https://t.co/w3Gpq9ECYi#UadaynarjeBhonsle | #AjitPawar | #NCP | #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2022
संबंधित बातम्या: