पुणे : संभाजी भिडे यांनी मुंबईत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसात आता राज्यभर उमटायला सुरुवात झाली. पु्ण्यात महिला काँग्रेस संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात. भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महिलांनी त्यांच्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या. त्यानंतर या टिकल्या संभाजी भिडे यांच्या बॅनरवर लावल्या. महिला काँग्रेसच्या पदाधिकारी म्हणाल्या, त्याचं वादग्रस्त विधान हे समस्य महिला जातीचा अपमान आहे. विधवा महिलांचा अपमान आहे. आमच्या आई, सासुबाई या सर्व महिलांचा अपमान आहे.
काही वृद्ध महिला या विधवा आहेत. त्यांचा अपमान हा भिडे यांनी केला आहे. फक्त पत्रकार महिलेला हुसकावून लावलं असं नव्हे तर त्यांनी सर्व महिलांना हुसकावलं. तुम्ही टिकली किंवा कुंकू नाही लावली तर माझ्यासमोर यायचं नाही.
महिला पदाधिकारी म्हणाल्या, याचा अर्थ तुम्ही पुढच्या पिढीला काय संस्कार देऊ पाहताय. वादग्रस्त विधान करायचं फेमस व्हायचं. पहिल्यांदा तु्म्ही तुमच्या घरातून संस्कार सुरू करा. अमृता वहिनी कधी लावतात का टिकली नाही लावतं.
मन्या तुला शौक आहे ना. मग तू अंगभर टिकल्या लावून फिर, असा संदेश भिडे यांच्या बॅनरवर टिकल्या लावून केल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
पोरी जा आधी कुंकू लावून ये, असं म्हणणाऱ्या भिडे यांना आता चांगलाच विरोध होताना दिसतो. पुण्यात तर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कपाडावरच्या टिकल्या काढून भिडे यांच्या बॅनरवर लावून निषेध केला.