पुणे : राज्यातल्या ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. (Amruta Fadanvis Slam Mahavikas Aaghadi Government Over Pune unlock)
4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही?
धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.
पुणे मेट्रोवरुन अमृता फडणवीस यांची टीका
दुसरीकडे पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.
“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या.”, असं उद्घाटन कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.
पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. पण तरीही सद्य परिस्थितीत पुणे शहर पूर्ण सुरु नाही. पण असं असलं तरी पुणेकरांनी कोरोनाचे नियम पाळावेत आणि खूप शॉपिग करावी, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
पुण्याचे निर्बंथ जैसे थे ठेवल्यालरुन पुणेकर नाराज होतो. अखेर पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये पुण्याच्या निर्बंधावरुन चर्चा सुरु आहे. पुणे महापालिकने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यास पुण्याचे निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच दिलासा मिळू शकतो.
(Amruta Fadanvis Slam Mahavikas Aaghadi Government Over Pune unlock)
हे ही वाचा :
पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा