दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीत ट्रॅक्टर रॅली, अण्णा हजारेंनी दाखवला हिरवा झेंडा

| Updated on: Jan 26, 2021 | 3:22 PM

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे ट्रॅक्टर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपला पाठिंबा दर्शवला. | Anna hajare Support Delhi Farmers Tractor Rally

दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीत ट्रॅक्टर रॅली, अण्णा हजारेंनी दाखवला हिरवा झेंडा
Anna Hajare Supports Delhi Farmer protest
Follow us on

अहमदनगर : राजनाधी नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे ट्रॅक्टर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभाग दर्शवला. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, असं आवाहन अण्णा हजारे यांनी यावेळी केलं. (Anna hajare Support Delhi Farmers Tractor Rally)

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरातून शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्याने तिरंगा रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला. संघर्ष समन्वय समिती बरोबरच विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेऊन केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे.

शेतकऱ्यांची मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर जाचक कायदे लादले असून हे कायदे व्यापाऱ्याच्या फायद्याचे आहेत, यातून शेतकऱ्यांचा कसलाही फायदा होणार नाही, तर अशा कायद्यांमुळे भांडवलशाहीला फळ मिळेल अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.

 

दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांचं शांतता राखण्याचं आवाहन

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

(Anna hajare Support Delhi Farmers Tractor Rally)

हे ही वाचा :

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज