पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन दुपारनंतर मेट्रोचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी ( citizens)खुला करण्यात आला आहे. यानंतर पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. नागरिकांनी केलया प्रवासातून मेट्रोला पाच लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अनेक नागरिकांनी सहकुटुंब , तरुणांनी मित्रमैत्रिणींच्या सोबत प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटूला. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन) लिमिटेडकडून पुण्यात महामेट्रोच्या (Mahametro) एकूण 32 किलोमीटरच्या मार्गापैकी12 किलोमीटरच्या मार्गावर काल पासून मेट्रो सुरु झाली. मेट्रो प्रशासनाच्या नियोजनानुसार दर अर्ध्या तासाच्या वारंवारितेने मेट्रो धावत आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी पाच स्थानके कार्यान्वित केली आहेत. यामध्ये तीन स्थानकांपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट आणि चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे.
मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना गरवारे कॉलेज, नळस्टॉप ते आयडीयल कॉलनी पर्यंत 10 रुपये तिकिट असणार आहे. त्यानंतर गरवारे कॉलेज ते आंनद नगरच्या चौथ्या स्टॉपसाठी 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाज स्टॉप पर्यंतच्या प्रवासासाठीही 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. गरवारे कॉलेज ते वनाज पर्यंतच्या मेट्रोचे मार्गवर नळस्टॉप, आयडीयल कॉलनी, आंनद नगर, ही स्थानके असणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिका ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रवासासाठीही पहिल्या तीन स्थानकानांसाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. त्यानंतरच्या तिसरी व चौथ्या स्टेशनासाठी 20 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यानच्या महामार्गावर संत तुकाराम नगर , भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी ही स्थानके असणार आहेत.
हे करा
हे करू नका
रशियाच्या हल्ल्यानंतर सर्वत्र आगीचे, धुराचे लोट, युक्रेनमधील शहरे उद्ध्वस्त
युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!