मोठी बातमी! राज्य सरकार दिल्लीपुढे झुकले?, महाराष्ट्र गीतातील ‘ते’ कडवं वगळलं; असीम सरोदे यांचा सनसनाटी दावा

| Updated on: Feb 01, 2023 | 3:03 PM

महाराष्ट्र गीत घोषित करत असताना गीतातील तिसरं कडवं वगळण्यात आलं आहे. गर्जा महाराष्ट्र या गीतातील दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा... हे कडवं वगळण्यात आले आहे.

मोठी बातमी! राज्य सरकार दिल्लीपुढे झुकले?, महाराष्ट्र गीतातील ते कडवं वगळलं; असीम सरोदे यांचा सनसनाटी दावा
Garja Maharashtra Maza
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: महाराष्ट्र गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत म्हणून लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असतानाच एक महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र गीतातील एक महत्त्वाचं कडवंच वगळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. असीम सरोदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र गीत घोषित करत असताना गीतातील तिसरं कडवं वगळण्यात आलं आहे. गर्जा महाराष्ट्र या गीतातील दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा… हे कडवं वगळण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा असीम सरोदे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारमुळे हे कडवं वगळण्यात आले असेल, अशी टीका करतानाच महाराष्ट्र गीतातील अत्यंत महत्त्वाचं कडवं वगळण्यात आलं. हा महाराष्ट्र गीताचाच अपमान आहे. त्यावर राज्य सरकारने उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

सरकार झुकले?

दरम्यान, महाराष्ट्र गीतातील महत्त्वाचं कडवं वगळण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. केंद्र सरकारपुढे राज्य सरकार झुकले आहे. केंद्राला घाबरूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सरकारकडून त्यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

म्हणून निर्णय घेतला

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एक साकारात्मक दृष्टीकोण ठेवून निर्णय घेतला आहे. गर्जा महाराष्ट्र माझा… या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

विधीमंडळाला विनंती करणार

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून आम्ही मंत्रीमंडळात घेतलं आहे. राष्ट्रगीतानंतर यापुढे हे राज्यगीत म्हटलं जाणार आहे. विधानभवनातील वंदे मातरम नंतर हे राज्यगीत म्हटले जावे अशी विनंती आम्ही विधीमंडळाला करणार आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.