पुणे – शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर (ShivSena Raghunath Babanrao Kuchik) बलात्काराचा (Rape case)आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयन्त तरुणीने केला आहे. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील(Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.याबाबत पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
लग्नाचे आमिष दाखवत 24 वर्षीय तरुणी सोबत शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली होती.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?
Nandurbar : जाळायचे होते पाचट अन् जळाला ऊस, अवघ्या दोन तासात 12 एकरातील फड जळून खाक