बारामतीत आज ‘जन सन्मान रॅली’ होत आहे. या रॅलीवेळी अजित पवार यांनी महिलांवर्गाची भेटी घेतली. त्यांना ‘लाडकी बहीण योजने’बाबत जागृत केलं. या योजनेला अधिकाधिका महिलांनी लाभ घ्यावा, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. फॉर्म भरण्यासाठी रांगा लागल्याचं दिसत आहे. याबाबतही अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे. फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरू नका. एकाद्या भगिनीने ऑगस्टमध्ये जरी ‘लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरला तरी जुलै महिन्याने दीड हजार रुपये या महिलांना ऑगस्टमध्ये दिले जातील, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवार यांनी ‘जन सन्मान रॅली’ला संबोधित केलं. मी जसा राज्याचा विचार केला. तसंच विचार मी बारामतीचा देखील विचार केला. 180 कोटी बारामती मध्ये मिळणार आहेत. लाडकी बहिण योजने मधून पैसे मिळतील. 46 हजार कोटी रुपये राज्याला मिळणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी, आत्मनिर्भर व्हावी. हेच सरकारचं धोरण आहे, असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहेत. हौसे, नवसे, गसे येतील पण हा अजित दादा शब्द देणारा आहे. आम्ही खोटं बोलणार नाही, सत्ता येते सत्ता जाते. ताम्र पाठ घेऊन कोणी आलेलं नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे. काल अमितभाई शाह यांना भेटलो. त्यांना साखरेच्या संदर्भात बोललो. एमएसपी वाढवला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
वरुणराजा सुद्धा आपल्यासोबत आहे. जन सन्मान मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा, तालुका ढवळून काढायचा आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, विकासाचे ध्येय ठेऊन पुढे जायचं आहे. मला बारामती बघत बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांनी जबाबदारी पाळायची आहे. घटनेला, संविधान याला कोणी ही धक्का लावणार नाही. चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. आज आमच्याकडून चुका झाल्या, मोठा मंडप टाकायला हवा होता, काळजी करू नका, त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. शिवाजी गर्जे आणि विटेकर यांचंही अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले.