लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, महिलांचं उत्पन्न…

| Updated on: Jul 07, 2024 | 4:16 PM

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : उपमुख्यंमंत्री अजित पवार आज बारामतीत आहेत. संत तुकाराम महाराज आज बारामतीत आहे. या पालखी सोहळ्यात अजित पवार सहभागी झाले आहेत. यावेळी लाडकी बहीण योजनेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, महिलांचं उत्पन्न...
अजित पवार. उपमुख्यमंत्री
Image Credit source: Facebook
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या उत्पन्नाबाबत त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ज्यावेळी राज्य सरकार चालवता तेव्हा गोरगरिबांचा विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा विचार करायचा असतो. आपण वर्ड बँक असेल किंवा केंद्र सरकार असेल रस्ते विकास महामंडळाकडून कोट्यावधी रुपयांची कामे चालली आहेत. केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत. गोरगरीब महिलांना ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना आपण दीड हजार रुपये महिना देणार आहोत. ज्यांना आई-वडील गरीब असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्याही करिता 50% सवलत होती ती 100% केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातील, असं अजित पवार म्हणालेत.

तुकोबारायांच्या चरणी अजितदादांचं साकडं

संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीतील काटेवाडीत आहे. यावेळी अजित पवार पालखीत सहभागी झाले होते. देहूवरून आणि आळंदीवरून दोन्ही पालखी मार्गस्थ झाल्या आहेत. त्यामुळे वारकरी आणि जनतेत प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. काही भागात पाऊस चांगला झालाय. त्यामुळे पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाची गरज आहे आपण वाट बघत आहोत. काटेवाडीत काही काळासाठी पालखीचा विसावा घेतला जातो. या ठिकाणची मेंढ्यांची रिंगण लोकप्रिय झाला आहे, असं अजित पवार म्हणाले.

तुकोबा आणि माऊली तसंच पांडुरंगाच्या चरणी हीच मागितलं की, सर्वांनी सुखाने समाधानाने आनंदाने राहावं. सर्वांच्या अडचणी दूर व्हाव्यात पाऊस काळ चांगला व्हावा. शेतकरी सुखी असो साकडं पांडुरंग चरणी घातलं कोणाला मदत लागत असेल. महायुतीमधील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार केव्हाही तयार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर म्हणाले…

मी पण शेतकरी आहे माझी शेती याच काटेवाडीमध्ये आहे. तिथे लाईटच्या बिलाबाबत तो शेतकऱ्यांची नेहमी तक्रार असते, म्हणून फार विचारपूर्वक साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज मापे करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असंही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना वीजबील माफी दिली आहे. त्यांना आता वीज बिल भरायचं नाही. दुधाला लिटरला पाच रुपये वाढवून दिले आहेत. दुधाची पावडर निर्यात करायला सवलत दिली आहे. आताच्या केलेल्या अर्थसंकल्पातील सर्व योजना पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्य सरकार कठीण आहे, असं म्हणत अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे.