कालची सभा अमिरेकेत झाली असं त्यांना वाटतंय. अमेरिका काही पत्रकार आले होते. पवारसाहेब यांच्या पायाशेजारी सुप्रिया सुळे बसली आणि एका बाजूला युगेंद्र, दुसऱ्या बाजूला रोहित होता… सर्व कुटुंब जवळ घेऊन बसलं होतं. अमेरिकेत जावं कुटुंब किती एक आहेत… सर्व संस्था साहेबांनी काढल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी काय केलं? गप्प बसलो का? संस्था सर्व त्यांनी काढल्या परंतु जन्म झाला नव्हता, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. बारामतीतील काटेवाडी जवळच्या कन्हेरी गावातील मारुतीवर पवार कुटुंबियांची श्रद्धा आहे. त्यामुळे कन्हेरीतील मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. काल याच मंदिरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता. पवार कुटुंबाच्या परंपरेनुसार कन्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात होते. तसंच यंदाही प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
आमचे चिरंजीव- युगेंद्र पवार सांगत होते सर्व साहेबांनी केलं. सर्व खोटं बोलत आहेत. परंतु साहेबांचे आशीर्वाद होते. धमक्या कोण देतोय आम्ही खाली मान ऐकतोय. धमक्या दिल्या तर एवढ्या मतांनी निवडून आलो असतो. शारदानगर शैक्षणिक संकुलात धमकी देऊन कामावरून काढलं जातंय, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक सुनेची- लेकीची, नणंद-भावजय यांची नाही. तर ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ही देशाची निवडणूक आहे. माझ्यावर आरोप केले तरी माझ्या अंगाला भोक पडत नाहीत. 1989 साली अजितला लोकसभा निवडणूक लढवा, असे काही जणांनी सांगितलं. मात्र साहेब म्हणाले अजितला दिल्लीला जाऊ द्या. मी जातो, काटेवाडीला शेती करायला… सुप्रियाच्या लग्नानंतर राजकारणात कोणी यायचे विचारलं गेलं. त्यावेळी सर्वांनी व्यवसायात लक्ष दिले. सर्वांनी धंदा पाणी सोडलंय आणि प्रचारात आलेत. आमचे थोरले बंधू आमच्या कार्यकर्ता यांच्याकडे जातात. लोकसभेला मतदान करा आणि विधानसभेला आम्ही नाही मत मागायला येणार असं सांगत आहेत. आमच्या कार्यकर्ता यांच्यात संभ्रम निर्माण केला जातोय, असंही अजित पवार म्हणाले.