तो माझी मिशी काढण्याची वाट बघतोय; अजित पवारांनी कुणावर रोखला बाण

| Updated on: May 07, 2024 | 12:29 PM

Ajit Pawar : बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात 'मेरी माँ मेरे साथ हैं!' हा डायलॉग फेमस झाल्यानंतर आता मिशी पुराण पण गाजत आहे. अजित पवार यांनी मतदानाच्या दिवशी, तो माझी मिशी काढण्याची वाट बघतोय, मी पण पाहतोय, असा बाण रोखला.

तो माझी मिशी काढण्याची वाट बघतोय; अजित पवारांनी कुणावर रोखला बाण
ajit pawar
Follow us on

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बारामतीचा रणसंग्राम गाजत आहे. मतदानाच्या दिवशी पण बारामतीने निवडणुकीच्या नकाशावर बाजी मारली. बारामतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ हा अजित पवार यांचा डायलॉग लोकप्रिय ठरला. तर आता मिशी पुराणाने पण लक्ष वेधले आहे. अजितदादांनी, तो माझी मिशी काढण्याची वाट बघतोय,असा बाण रोखला. त्यामुळे आता पुन्हा चर्चा झडली आहे. निकाल लागल्यानंतर हे रुसवे-फुगवे कायम असतील का? बारामतीत पवार कुटुंबियात दरी वाढणार का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

काटेवाडीत केले मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडीत कुटुंबियांसह मतदाने केले. यावेळी त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि आई होती. कुठलीही निवडणूक मी महत्वाची मानतो. काम पाहून लोक आम्हाला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियात आपली आई सर्वात मोठी आहे. ती माझ्यासोबत आहे. ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ असा डायलॉग मारत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

हे सुद्धा वाचा

अजून कसली वाट बघतोय, ते पाहणारच

बारामतीत आता मिशी पुराण रंगलं आहे. अजितदादांचे बंधू श्रीनिवास पाटील यांच्या मिशीसंदर्भातील वक्तव्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी करत बाण पण रोखला. “त्याने 10 वर्षापूर्वी मिशी काढली. तो आता माझी मिशी काढण्याची वाट बघतोय. अजून तो कसली कसली वाट बघतोय ते मी पाहणारच आहे”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पैसे वाटपाची करा चौकशी

बारामतीत तुमच्यावर पैसा वाटल्याचा आरोप करण्यात येत असल्याच्या प्रश्नाला अजितदादांनी उत्तर दिले. हा आरोप खोटा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पैसे वाटले असतील. मी असे धंदे केले नाहीत. निवडणूक आयोगाने या पैसे वाटपाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. एकूणच मतदानाच्या दिवशी पण पवार कुटुंबियांमधील कलगीतुरा सुरुच होता. इतर मतदारसंघापेक्षा हाच मतदारसंघ राज्यात चर्चेत राहिला. आता निकालाची उत्सुकता राज्यालाच नाही तर देशाला लागली आहे.