बारामतीत पवार पॉवर कुणाची?, धक्कादायक निकाल; शेवटी…

| Updated on: Nov 06, 2023 | 1:42 PM

Baramati Gram Panchayat Election 2023 Result : बारामतीतील निकाल समोर आला आहे. हा निकाल धक्कादायक आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिली निवडणूक झाली. यात बारामतीकरांनी कुणाला आपला पाठिंबा दिला? बारामती शरद पवारांची की अजित पवारांची? वाचा सविस्तर...

बारामतीत पवार पॉवर कुणाची?, धक्कादायक निकाल; शेवटी...
Follow us on

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 06 नोव्हेंबर 2023 : बारामती… महाराष्ट्रातील एक तालुका. ज्याची देशभर चर्चा होते. बारामती म्हटलं शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती हे समीकरण मागच्या 50 वर्षांहून अधिक काळ रुढ आहे. बारामती शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र आता राष्ट्रवादी पक्षातच फूट पडली आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात पहिलीच निवडणूक पार पडली. राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. अशात बारामतीतील परिस्थिती काय आहे? बारामती पवारसाहेबांची की अजितदादांची? या प्रश्नाचं उत्तर बारामतीतील ग्रामीण भागातील जनतेनं या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलं आहे.

बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज मतमोजणी होत आहे. बारामती तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या 26 पैकी 24 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर दोन ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे.

अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायत

अजित पवार यांचं बारामतीत वर्चस्व पाहायला मिळतंय. अजित पवार गटाने 24 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

1)भोंडवेवाडी

2)म्हसोबा नगर

3)पवई माळ

4)आंबी बुद्रुक

5)पानसरे वाडी

6)गाडीखेल

7)जराडवाडी

8)करंजे

9)कुतवळवाडी

10)दंडवाडी

11)मगरवाडी

12)निंबोडी

13)साबळेवाडी

14)उंडवडी कप

15)काळखैरेवाडी

16)चौधरवाडी

17)वंजारवाडी

18)करंजे पूल

19)धुमाळवाडी

20)कऱ्हावागज

21)सायंबाचीवाडी

22)कोऱ्हाळे खुर्द

23) शिर्सुफळ

24) मेडद

बारामती तालुक्यात भाजपने दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. दोन ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. चांदगुडेवाडीत भाजपचा सरपंच आहे. बारामती तालुक्यातील पारवडीतही भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. या दोन गावांमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्यात आत्तापर्यंत 26 पैकी 24 जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर 2 जागी भाजपचा सरपंच निवडून आला आहे.

बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. 32 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्राम पंचायतींचा आज निकाल लागणाल आहे. तर बारामती तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. पवारांच्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीचा देखील आज निकाल आहे. काटेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. अजित पवारांच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनेल उभं होतं. काटेवाडी ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता राहिली आहे. मात्र यंदा इथं नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.