लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी दौरा सुरु केल आहे. शरद पवारांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांना शरद पवार भेटी देत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे, नीरा या गावांना भेटी दिल्यानंतर पवार पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात पाहणी करत आहेत. शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा शेतीसोबतच जोडधंदा करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला. नुसतं शेती एक शेती करून चालणार नाही. इतरही व्यवसाय करावे लागतील. एमआयडीसी तरूणांना रोजगार देते.एमआयडीसीला पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले.
पुरंदर तालुक्यातील कोळविहरे गावात शरद पवार पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेती आणि जोडधंदा यावर शरद पवारांनी स्थानिकांना मार्गदर्शन केलं. दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना काय करता येईल. संदर्भात माहिती घेण्यासाठी मी आलोय. राज्य सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संयुक्त बैठक घेणार आहे. वातावरण बदलले आहे मात्र समाधानकारक नाही. निवडणूक झाली तुम्ही काही कमतरता पडू दिली नाही. पावसाची कमतरता आहे मात्र मतांची पडू दिली नाही. मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हे प्रश्न कायमस्वरूपी कसे सोडवता येईल. याबाबत आग्रह धरू, असं शरद पवार म्हणाले.
पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते. पुण्याला कारखाना द्यायचा नाही. कारखाना द्यायचा असेल तर बाहेर द्यायचा असा निर्णय मी त्यावेळी घेतला होता. शेती एक शेती करून चालणार नाही. एमआयडीसीला पर्याय नाही. याबाबत राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करणार आहे. जिथे शक्य आहे तिथे एमआयडीसी आणणार आहे. देशात सरकार आलं. यावेळी आलेले सरकार दुसऱ्याची मदत घेऊन आलं आहे. हे सरकार फार दिवस राहील असं वाटत नाही. कालच्या निवडणुकीत जी मदत केली तीच मदत येणाऱ्या निवडणुकीत पण करा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुरंदर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात स्थानिकांनी शरद पवारांपुढे कैफियत मांडली. या भागात नेत्यांच्या जमिनी आहेत. विजय शिवतारे यांची 450 एकर जमीन आहे. तर अशोक टेकवडे यांची 500 एकर जमिनी आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा मारला असा आरोप स्थानिकांनी केला. यावर मार्ग काढण्याचं आवाहन स्थानिकांनी शरद पवारांना केलं. त्यावर नेत्यांचे गाव असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.