लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची ‘पेरणी’ सुरु केली आहे. शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहेत. शरद पवार आजपासून पुढचे 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार घेणार 11 शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे तयारी सुरु केली आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी बारामतीकरांना अनपेक्षित बाब केली. याची बारामतीत चर्चा होतेय.
शरद पवार यांनी काकडे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या पूर्वीही शरद पवारांनी ही भेट घेतली होती. काकडे आणि पवार यांचं नेहमीच राजकीय वैर राहिलेलं आहे. संभाजी काकडे आणि शरद पवार हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. मात्र सध्या शरद पवार काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेत आहेत. बारामती दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी काकडे कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यामुळे पवार आणि काकडे कुटुंबातील राजकीय वैर आता संपणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
आजपासून शरद पवार यांचा बारामती दौरा करत आहेत. या दौऱ्यात योगेंद्र पवारही त्यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी सोमेश्वरनगर इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी दौरा करत आहेत. बारामती लोकसभेत फिरत आहेत. अलीकडे मी लक्ष घालत नव्हतो. दुसऱ्यावर जबाबदारी दिली होती पण आता लक्ष घालावं लागेल. ज्याच्याकडे सत्ता आहे. त्यांनी लोकाच्या हिताची काम केलं पाहिजे पण तसे दिसत नाहीय, असं शरद पवार म्हणाले.
साखर आपण जगात पाठवतो. साखर जेवढी बाहेर जाईल तेवढी साखर दर वाढते. साखर दराकडे केंद्र आणि राज्य सरकारच लक्ष नाही. मी पंतप्रधान मोदी यांना साखर दराबाबत पत्र लिहिले आहे. साखरेला दर मिळावा, त्याबाबत विचार करावा. त्यांनी निर्णय घेतला तर आनंद आहे आणि नाही घेतला तर तुमच्या माध्यमातून सांगायची वेळ आली तर तुमची साथ लागेल, असं आवाहन शरद पवार यांनी सोमेश्वरनगरच्या शेतकऱ्यांना केलं.