विरोधकांना संपविण्याचं काम, आपल्या लोकांना सुरक्षा, भास्कर जाधव यांची घणाघाती टीका

| Updated on: Oct 31, 2022 | 4:11 PM

पण आठवड्यातून एकदा कोर्टने हजेरी लावण्यात यावी, असं कोर्टाने सांगितले.

विरोधकांना संपविण्याचं काम, आपल्या लोकांना सुरक्षा, भास्कर जाधव यांची घणाघाती टीका
भास्कर जाधव यांची घणाघाती टीका
Image Credit source: tv 9
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने दडपशाही कारभार सुरू केला आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाला यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षात पाहावी लागते. पण सरकार विरोधी पक्षांचं आवाज बंद करत आहे. अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. सुरक्षा काढल्या जातात. इकडे पाय काढण्याची भाषा केली तर काही नाही. पण आम्ही भाषण केले म्हणून गुन्हे दाखल केले जातात. दोन समाजात तेढ निर्माण करेल असं भाषण केले, म्हणून गुन्हा दाखलं करण्यात आले.

पण आठवड्यातून एकदा कोर्टने हजेरी लावण्यात यावी, असं कोर्टाने सांगितले. मी कोर्टाचा मान राखत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी आलेलो आहे. अनेक प्रकल्प गेले. फक्त आश्वासन दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांना मोठे प्रकल्प देऊ असं आश्वासन दिलं जात आहे. केंद्रातील शहा यांच मन एवढं मोठं नाही की, गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देतील, असा आरोपही त्यांनी केला.

मोठे प्रकल्प आल्याने महाराष्ट्राचा फायदा होणार होता. मात्र आता लहान मुलाला गोळे खा अन् शांत राहा असं सांगितले जात आहे. तसे चालले आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.

50 खोके सर्वांपर्यंत पोहचले आहेत. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं मंत्री म्हणतात. गरिबांना वेळेवर दिवाळीची भेट दिली जात नाही, हे मात्र दुर्दैव आहे.विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू असताना आपल्या लोकांना सुरक्षा देत आहेत. सरकारनं समान वागणूक दिली पहिजे. महाराष्ट्र सरकारने सुरक्षा काढली, तर केंद्र सुरक्षा देत आहेत.

मी चाळीस वर्षे राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा व्यवस्था मागितली नाही. मात्र मला गेले तीन वर्षे वाटले सुरक्षा हवी, म्हणून मागितली. बच्चू कडू आणि रवी राणा यांची नुरा कुस्ती आहे. लोकांनी बाकी सगळं विसरावे. म्हणून लक्ष वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

महाविकासआघाडी सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. महाराष्ट्र जागरूक आहे, असा एकेरी उल्लेख करून काही होतं नसतं, असंही ते म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, माझ्याविरोधात नियमबाह्य गुन्हा दाखल केला. पोलीस कोणाच्यातरी प्रेमाखातर काम करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली नाही. राज्यात वेगवेगळ्या नेत्यांची नक्कल केली जाते. ही सत्ता हुकूमशाहीची आहे. त्यातून हे गुन्हे दाखल होत आहेत. महाप्रबोधन यात्रा अधिक जोमाने होणार असल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.