पुणे- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik)यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहे.दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्याशी संबध असलेल्या देशद्रोही नवाब मलिक यांचा धक्कार असो असे फलक घेत, पुणे भाजपच्या नेत्यांनी आज आंदोलन केल. यावेळी अल्पसंख्याक मंत्री पदावरून मालिका यांची हकाल पट्टी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवाब मालिका यांचा धिक्कार असो अश्या घोषणाही यावेळी देण्यात आले. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागतील असा इशारा भाजपतो आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांची ईडीकडून सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मलिकांना अटक केली आहे. गुन्हेगारी दाऊद गँग संदर्भात चौकशी सुरु असताना नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
‘सेक्रेड गेम्स’चा थरार आता ‘स्टोरीटेल’वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात
धड्याsssम! सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका
महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य