पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतंर्गत पंतप्रधान आवास योजनेची सोडत चिंचवड येथे काढण्यात येणार होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. यासाठी दुपारपासून शहरातील नागरिक जमा झाले होते. मात्र अचानक ही सोडत रद्द करण्यात आली. त्यामुळे अर्जदाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या श्रेयवादाचा फटका अर्जदारांना बसला आहे. (BJP NCP Fight For Credit PMAY lottery program in Chinchwad)
महापालिकेच्या पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते सोडत होणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र भाजपने प्रत्यक्षात अजित पवारांना निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने निदर्शने केली.
शहरातील नागरिकांनी गेल्या चार वर्षे या घरांच्या सोडतीसाठी प्रतीक्षा केली. यासाठी आजही नागरिक पाच तास बसून राहिले. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकारणामुळे गरीब जनतेचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या सोडतीकडे अनेक नागरिक मोठ्या आशेने पाहत होते. मात्र त्यांच्या नशिबी फक्त निराश पडली आहे. यामुळे अनेकांना डोळ्यात अश्रू घेऊन पुन्हा परतावं लागलं आहे.
तर दुसरीकडे या घराच्या सोडतीचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून भाजपने महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पालकमंत्री अजित पवार यांचा दबाव आणून हा कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला
भविष्यात या सदनिकांची सोडत ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. तेव्हा राजशिष्टाचाराचे पालन ही केली जाईल. आजच्या सारखा गोंधळ होणार नाही. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टनसिंग पाळलं जाईल, असं म्हणत आयुक्त श्रावण हर्डीकर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र सत्ता मिळवण्यासाठी श्रेयवाद होणं हे काही नवीन बाब नाही. मात्र हा श्रेयवाद गोरगरिबांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा असेल, तर तो राजकारणाची लाज काढणारा ठरतो. याची जाणीव नेत्यांनी ठेवायला हवी. (BJP NCP Fight For Credit PMAY lottery program in Chinchwad)
संबंधित बातम्या :
अहंकाराने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द : चंद्रकांत पाटील