सोलापूर: भाजपचे माजी उपजिल्हाप्रमुख शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासल्या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे ,संदीप केंदळे ,सुधीर अभंगराव ,लंकेश बुरांडे सह 25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं केलेल्या आंदोलनानंतर आता पंढरपूरमध्ये शिवसेना आक्रमक झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप करत शिरीष कटेकर यांना शिवसैनिकांनी काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.(BJP party worker Shirish Katekar file compliant against Shivsena workers in Pandharpur)
भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार राज्यभर चांगलाच गाजला होता. या प्रकरणी शिरीष कटेकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. . भा.द.वि कलम 324,323 ,143,147,149 ,500 प्रमाणे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून”, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरांमध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
भाजप माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी त्यांना गाठलं आणि त्यांना काळं फासलं. तसंच त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना जाब विचारत शिवीगाळही केली. दरम्यान, शिरीष कटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी! https://t.co/6k1MWl6DyU @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT @Dev_Fadnavis #Pandharpur #Shivsena #BJP #uddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी!
VIDEO : पांढरे कपडे, हातात झाडू, राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्वच्छता मोहिमेचा आदर्श
(BJP party worker Shirish Katekar file compliant against Shivsena workers in Pandharpur)