पुणे: गोव्याच्या बाबत कोणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नये. गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत ( sanjay raut) यांना लगावतानाच गोव्यात भाजप 22 जागांवर विजयी होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला. निवडणुकीत प्रत्येकाला उभं राहायचं असतं. त्यासाठी प्रत्येकजण तिकीटाची मागणी करतो. पण सर्वांनाच तिकीट देणं शक्य नसतं. त्यामुळे तिकीट न मिळाल्याने थोडी बहुत अस्वस्थता असते. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (cm pramod sawant) यांनी चांगली कामं केली आहेत. त्यांच्या कामावर जनता खूष आहे. आम्ही भाजपलाच मतदान करून पुन्हा सत्तेत बसवणार असं तिथली जनताच म्हणत आहे. त्यामुळे कुणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नयेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन केलं. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत होतो. तेव्हा त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होतो. मात्र, ते आजारी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद रिकामं ठेवू नये किंवा घरातच कुणाला तरी पद द्यावं असं मी म्हटलं होतं, असं पाटील म्हणाले.
मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आल्याने वाद रंगला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. टिपू सूलतान या नावाला आमचा विरोध आहे. आम्ही याला विरोध करू किंवा आंदोलन करू हा प्रयत्न हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
12 आमदारांच्या निलंबनावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने 12 आमदारांचं निलंबन करून संविधानाच्या गाभ्यालाच हात घातला आहे. हे मी सांगत नाहीये. सर्वोच्च न्यायालयानेच हे म्हटलं आहे. कोणत्याही आमदाराचं दोन महिन्यापेक्षा अधिक काळ निलंबन करता येत नाही. पण तरीही या सरकारने आमच्या आमदारांचं निलंबन केलं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पद्धत बदलली. घटनेत गुप्त पद्धतीने मतदान करण्यास सांगितलेलं असताना ही पद्धत बदलली. हे घटनाबाह्य आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल केला. डोळं मिटून, कान बंद करून बसायचं त्याचं उदाहरण म्हणजे राज्य सरकार आहे. राज्यात राजकीय आरक्षणासाठी राजकीय मागासलेपणाचा डेटा कोणाकडेही नाही. मागास आयोगाकडे आणि कोणाकडेच ओबीसींच्या मागासलेपणाचा डेटा नाही. राजकीय मागासलेपण कधी काढावं लागलं नाही. देवेंद्र फडणवीस हुशार मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देताना सांगितलं की मला नोकऱ्यातलं, शिक्षणातलं, आरक्षण मागा, राजकीय नाही. या देशात राज्यात कधी राजकिय मागासलेपणाचा डेटा गोळा केला गेला नाही. आता म्हणतायेत, पैसै देतो. आता कसले पैसे देतायेत. मंत्रिमंडळाची बैठक हा सगळा दिखावा चाललाय, असा हल्लाही त्यांनी चढवला. 8 तारखेला राज्याचं मागासवर्गीय आयोग सांगणार आहे. आम्ही कोणता डेटा देणार आहोत, असंही ते म्हणाले.
सर्वसामान्य माणसांना जीएसटी अशा गोष्टी माहिती नसतात. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था या सरकारची आहे. जीएसटी कौन्सिल पैसै देणार होतं. सरकार नाहीत, असं सांगतानाच अजित पवार हे अज्ञान प्रगट करत आहेत, असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/aPsXtu9HXu#Election | #RepublicDay2022 | #NewsUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2022
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भीक मांगो आंदोलन