केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं; भुजबळ म्हणाले, जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा

| Updated on: Nov 28, 2021 | 2:14 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे.

केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं; भुजबळ म्हणाले, जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा
chhagan bhujbal
Follow us on

पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. जनावरांची गणना होते. मग आम्हाला ही मोजा, अशी मागणी करतानाच केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. जनावरांची गणना होते. इथे आम्हाला मोजा. हात वर करुन इथं ठराव करा, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, असं असं भुजबळ म्हणाले.

भुजबळांची सल

फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले लोक या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, याच दुःख होतं, अशी सल त्यांनी बोलून दाखवली. तसेच फुले, शाहू. आंबेडकरांचे पुतळे जागोजागी उभे केले पाहिजे. ही आपली माणसं आहेत हे सर्व समाजाला सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकारचं आडमुठं धोरणं

केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करायला त्यावेळी आम्ही भाग पाडलं. पण केंद्रात भाजपचं सरकार येताच ओबीसींचा डाटा द्यायला नकार घंटा सुरू झाली. केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. तरीही भाजपचे लोक ओबीसी जनजागरण मोर्चा काढताहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे, असं ते म्हणाले.

फुल्यांना भारतरत्न नको

महात्मा फुलेंना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. पण माझी मागणी वेगळी आहे. महात्मा हे पदच मोठं आहे. त्यामुळे तेच राहिलं पाहिजे. आता काय कुणालाही पद देतात, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळांची शेर-ओ-शायरी

भुजबळांनी आज तडाखेबंद भाषण केलं. ते तब्बल अर्धा तास बोलले. या भाषणात भाजपवर टीका करतानाच आपल्या या भाषणातून त्यांनी शेरोशायरीचीही मुक्तपणे उधळण केली.

मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है,
पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर होता है.

नहीं बदल सकते है हम, औरो के हिसाब से,
एक लिबास हमे भी दिया है, खुदा ने अपने हिसाब से.

सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै…
पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं.

 

संबंधित बातम्या:

सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में… भुजबळांची शेरोशायरीतून तिरंदाजी सुरू असतानाच वीज गेली अन्…

BMC Elections: नव्या प्रभागांना अद्याप मंजुरी नाही, मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणार?; वाचा सविस्तर

Maharashtra : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक