पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला (Leopard) अखेर जेरबंद (Martingale) करण्यात वन विभागाला (Forest department) यश आले आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे स्थानिक नागरिक, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. नागरिक आणि ग्रामस्थ भयभीत वातावरणात जगत असल्याने यासंबंधी वनविभागाला वारंवार विनंती करण्यात आली होती. पाळीव प्राण्यांवरचे बिबट्याचे हल्ले तर नित्याचे झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने कारवाई करावी, या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार वनविभागाने अखेर या बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे काही अंशी भीती कमी झाली आहे.
जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराड्यात, विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढेच नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच, लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगदा परिसरातही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.
Junnar Leopard : पिंपळगाव तर्फे नारायणगावात बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश pic.twitter.com/w4ioUxgdPm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2022
नुकतेच चाकण एमआयडीसीतील बिबट्याला (leopards) जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले. काल सकाळी 11:30 च्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे. नर जातीचा हा बिबट्या असून अडीच वर्ष वयाचा हा बिबट आहे.