पुणे : पुणे शहरात बसमध्ये नेहमीच गर्दी असते, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तसेच महिला यांची कॉलेजला जाण्याची लगबग असते, अशा वेळी काही समाजकंटक संधी साधत असतात. पुण्यात मेट्रो आली तर ही गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पण प्रत्येक पुणेकराला आणि पुण्यात येणाऱ्या व्यक्तीला या गर्दीचा सामना करावाच लागतो. पण सतत एकच माणूस एका तरुणीचा पाठलाग करुन गैरवर्तन करत असेल तर ही गंभीर बाब आहे, यावर पोलिसांनी वेळीच कारवाई करुन त्याला जेरबंद केलं आहे.
पुणे शहराबरोबरच परिसरातील अनेक महिलांसोबत गैरवर्तन करण्याचे प्रकार प्रचंड वाढीस लागले आहे. कोथरूड परिसरातही आता महिलांसोबत गैरवर्तन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागत असल्याचे समोर आले आहे.
एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून बसमध्ये त्रास करणाऱ्या आणि मुलीचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरुला कोथरूड पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे शहरातील महिलावर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याविरोधात आता पोलिसा तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या मुलीला त्रास देण्यात येत होता. ती मुलगी नळस्टॉप बसवरून ये जा करत होती.
12 रोजी बसमध्ये या माथेफिरुने या मुलीसोबत बसमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने माझ्यासोबत मैत्री करशील का असा सवाल विचारत त्याने बसमध्येच मुलीचा हात पकडला होता. यावेळी मुलीचा हात पकडून तू माझ्यासोबत चल तुला चहाची पार्टी देतो असंही त्याने म्हटले होते.
हा प्रकार 12 रोजी घडल्यानंतर पुन्हा त्या माथेफिरुने मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीला त्याने 12 रोजी विचारुनही ती त्याला दात देत नसल्याचे पाहून त्याने पुन्हा 14 तारखेला त्याने पुन्हा पाठलाग केला.
यावेळी तिचा पाठलाग करत तिच्याकडे विचित्र हावभाव करत तिचा विनयभंग केला आहे. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली.
त्यानंतर मुलीने पालकांना सोबत घेऊन त्रास देणाऱ्या विरोधात कोथरून पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी कोथरून पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून तात्काळ त्रास देणाऱ्या मुलावर कारवाई केली आहे. पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.