पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी 2 वाजता जाहीर झाला. निकालाच्या टॉप लिस्टमध्ये पुण्याने सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर, तो अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर आपण पाहू शकता. CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर मिळेल. दहावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या. यातील टर्म 1ची परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 11 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. त्याचबरोबर 10वीच्या टर्म 2च्या परीक्षा 26 एप्रिल ते 24 मे या कालावधीत घेण्यात आल्या होत्या, ज्याचा निकाल (Result) आज दुपारी जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत झोननिहाय आणि शाळानिहाय दहावीचा निकाल कसा लागला ते जाणून घेऊ या…
क्रमांक, विभागाचे नाव आणि पास पर्सेंटेज
CBSE बोर्डाने अंतिम निकाल तयार करण्यासाठी टर्म 1च्या परीक्षेला 30 टक्के आणि टर्म 2च्या परीक्षेला 70 टक्के वेटेज दिले आहे. त्याचवेळी, या वर्षी एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 94.40 टक्के आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 95.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.80 टक्के आहे. त्याचवेळी, 90 टक्के ट्रान्सजेंडर उमेदवार देखील यावर्षी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSEने म्हटले आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये नमूद केल्यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील. कंपार्टमेंट श्रेणीमध्ये ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 23 ऑगस्ट 2022पासून कंपार्टमेंट परीक्षा घेण्यात येईल. कंपार्टमेंट परीक्षा फक्त टर्म 2च्या अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे.