पुणे: पुणे ते मुंबई (Pune to Mumbai) आणि मुंबई ते पुणे (Pune Mumbai) असा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आजपासून चाकरमान्यांना मासिक पास काढता येणार आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई पुणे इंटरसिटी गाड्यांमधील अराखीव डब्यांची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ,पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचा मासिक पास काढता येणार असल्याची माहिती आहे. कोरोनामुळं आरक्षित टिकीटाशिवाय प्रवास करता येत नव्हता. अखेर जनरल तिकीटाबरोबरच पास काढता येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. मात्र, रेल्वे प्रवासासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असणं आवश्यक आहे.
In continuation to the earlier notification, it has been decided to restore earmarking of AC chair car coaches in the following trains as per pre- pandemic applicability.? pic.twitter.com/frzIUdIh0q
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 21, 2022
मुंबई मनमाड मुंबई, मुंबई पुणे मुंबई डेक्कन क्वीन, पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस आणि सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये अराखीव कोच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.
इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये अराखीव कोच सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्र सरकारच्या 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशांचं पालन करावं लागणार आहे. रेल्वेतून प्रवास करण्यासाठी संबंधित व्यक्तीचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर, संबधित प्रवाशाकडे यूनिवर्सल पास असणं आवश्यक आहे. प्रवास करताना प्रवाशानं केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
Restoration of AC Chair Car seats/coaches for first class season holders in the following trains as per pre- pandemic applicability. Please read here? pic.twitter.com/E8Hy2LOV4f
— Central Railway (@Central_Railway) March 21, 2022
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल डब्यातील अराखीव तिकिटांची सुविधा 29 जूनपासून सुरु होणार आहे. तोपर्यंत अशा 165 गाड्यांमधील जनरल डब्यातील तिकीट घेण्यासाठी बुकिंग करणं आवश्यक राहणार आहे.
लाकूड ओढण्यात ‘सोन्या’ने मारली बाजी, तर लहान गटात ‘रावणा’चा आला पहिला नंबर