पुणे: पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakanat Patil) यांनी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. (Chandrakant Patil demands launch Suo Moto complaint in Pooja Chavan suicide case)
ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकराच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. राज्यात कायदा विषय संपला आहे, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणं, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुळची परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण संबंधित मंत्र्यांचं थेट नाव कुणीही घेतलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपा त्या मंत्र्याचं नाव उघड करताना दिसते आहे.
संंबंधित बातम्या :
परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक
बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण
(Chandrakant Patil demands launch Suo Moto complaint in Pooja Chavan suicide case)